जाणीव जागृती आणि क्षमता विकास

रोहयोच्या आखणी व अंमलबजावणीत जे विविध घटक सहभागी आहेत. जसे की गावकरी, पंचायत सदस्य, सरकारी कर्मचारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्राम रोजगार सेवक, यांचे प्रशिक्षण व क्षमताबांधणीचे काम प्रगती अभियानने केले आहे.

ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण

प्रत्यक्ष गावपातळीवर लोकांसोबतचे काम आणि सरकारी यंत्रणेसोबत समन्वयाचे काम या दोन्हीच्या अनुभवातून ‘ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण’ हे मोड्यूल तयार झाले आहे. रोहयो मजूर आणि अंमलबजावणी यातील दुवा म्हणजे रोजगार सेवक. या पदावरील व्यक्तीची भूमिका व जबाबदारी महत्त्वाची आहे. ती पेलण्यासाठी या रोजगार सेवकाला माहिती, कौशल्ये व दृष्टिकोनाच्या बाबतीत सक्षम करणे हा या मोड्यूलचा हेतू आहे. त्याचा लाभ या पदावरील व्यक्तीलाही होतो अाणि रोहयो मजूरांनाही. 

गावसमुदायाचे प्रशिक्षण

रोहयोची प्रभावी अंमलबजावणी करायची तर स्थानिक नागरिकांकडेही माहितीचे बळ पाहिजे. त्यादृष्टीने गावातील युवक, सामाजिक कार्यकर्त्यांना तयार करणारे, रोहयोची सर्व सखोल माहिती व जाण देणारे हे प्रशिक्षण आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावात प्रगती अभियानने गावकऱ्यांच्या सहभागाने रोहयोची कामे यशस्वीपणे पार पाडली आहेत. त्या अनुभवाच्या आधारे या प्रशिक्षणाची आखणी केली गेली आहे.

Up Comming Trainings

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam viverra euismod odio, gravida pellentesque urna varius vitae.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam viverra euismod odio, gravida pellentesque urna varius vitae.

सरपंच प्रशिक्षण

गावातील निर्णयप्रक्रियेतील एक मुख्य व्यक्ती या नात्याने सरपंच व इतर लोकप्रतिनिधींना रोहयोची सखोल माहिती असणे जरूरीचे आहे. रोहयोतून कामाच्या हक्काची हमी दिली आहे याची जाणीव लोकप्रतिनिधींना होणे व योजना मिळवण्यासाठीचे नियम व कार्यपद्धती समजावून देणे असे या प्रशिक्षणाचे स्वरूप आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

रोहयोची कामे ज्या विविध सरकारी खात्यातून निघतात व पाहिली जातात, म्हणजे शेती, महसूल आणि रोहयो विभाग, अशा विविध सरकारी यंत्रणेतील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना रोहयोतील त्यांची भूमिका समजावून देणारे हे प्रशिक्षण आहे.

Project One

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam viverra euismod odio, gravida pellentesque urna varius vitae.