अल्पभूधारक शेतकरी

शेतकरीसमूह सर्वात वंचित व असहाय्य स्थितीत आहे. वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट होते.
शेती उत्पादन व विपणनाच्या नव्या तंत्रज्ञानामुळे गरीब शेतकऱ्यांसमोर काही संधी व पर्याय उपलब्ध झाले आहेत. फलोत्पादन हा गरिबीच्या चक्राला भेदण्याचा असाच एक पर्याय आहे. पण त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व विपणन यंत्रणा यांची माहिती नसल्यामुळे त्याचा लाभ घेता येत नाही. पीक आल्यानंतर ते मिळेल त्या पडेल भावाला विकण्याखेरीज शेतकऱ्यांकडे बऱ्याचदा अन्य पर्याय नसतो. ग्रामीण शेतकरी जर संघटित झाले, त्यांना बाजारपेठेची अद्ययावत माहिती अवगत झाली तर त्यांच्या उत्पन्नात कमालीचा फरक पडेल व त्यातून गरिबी निर्मूलन साधणे शक्य होईल. विस्तारित बाजारपेठेच्या साथीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी बाजारपेठ व शेतकरी यांच्यातील दुवा बनून काम करण्याची प्रगती अभियानची इच्छा आहे.


अल्पभूधारक शेतकरी :

 • डाळींबशेतीचा पर्याय

 • The Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act 2005

  Ministry of Rural Development, India.

  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
  महाराष्ट्र

  डाळींबशेतीचा पर्याय

  कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी फळबागांचा पर्याय आहे आणि डाळींबासारख्या चांगला भाव देणाऱ्या फळांचे उत्पादन करणे शक्य आहे. पण यासाठी शेतकऱ्यांकडे आवश्यक ज्ञान पाहिजे आणि सुरवातीला लागणाऱ्या खर्चाची तरतूद पाहिजे. तसे झाले तर शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतो हा प्रगती अभियानाच सटाणा (नाशिक) आणि मोहोळ (सोलापूर) या दोन तालुक्यातल्या कामाचा अनुभव आहे.
  तीन वर्षे या दोन शेतकऱ्यांसोबत काम केले, त्यांना तंत्रज्ञान अवगत करून दिले, विविध प्रयोगातून सुरुवातीच्या लागवडीचा खर्च कमीत कमी करत आणला आणि यातून शिकून शेतकऱ्यांनी डाळींबशेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला अाहे.