कार्यक्षेत्र

 

प्रगती अभियानने आपल्या कामाची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ या तीन तालुक्यातील १५ गावांपासून केली. आता संस्था नाशिक जिल्ह्यातील १५० गावात काम करत आहे.

Nashik Map

नाशिक जिल्ह्यात १५ तालुके असून ५०% आदिवासी लोकसंख्या आहे. इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ तालुक्यातील मागास आदिवासी गावांपर्यंत संस्था पोहोचलेली अाहे.

लोकसंख्या व रोजगाराचे स्वरूप

इगतपुरी

त्र्यंबकेश्वर

पेठ

अनुसूचित जाती लोकसंख्या

९.२ %

५.४ %

०.८ %

अनुसूचित जमाती लोकसंख्या

३७.८ %

७७.९ %

९२.९ %

बिगारी कामगार

४६.० %

५८.५ %

५३.४ %

शेतमजरीचे प्रमाण

२५.४ %

३०.१ %

३८.१ %

 

हा परिसर डोंगराळ आहे, पावसाचे प्रमाण जास्त आहे, लहान टेकड्यांवर आदिवासी लोकवस्त्या आहेत.

शेतजमिनी डोंगर उतारावर आणि डोंगऱ्याच्या पायथ्याशी आहेत. पायथ्याच्या जमिनीवर भात, तर उतरावरील जमिनीवर खुरसणी, नागली ही पिके आलटून-पालटून घेतली जातात. शेती हेच रोजगाराचे मुख्य साधन असले तरी शेती पावसावर अवलंबून आहे. जमीन निकृष्ट आहे, त्यामुळे उत्पादन कमी अाहे. रस्ते, सिंचन, वीज, पाणी, संपर्क यंत्रणा इत्यादी सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही कमी आहेत. शेतीचे कामही दीर्घकाळ नसते त्यामुळे लोकांच्या हाताला कामाची गरज असते. रोजगार हमीच्या कामांची या भागात नितांत गरज आहे.

पेठमध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे, तर इतर दोन तालुक्यात काहिशी मिश्र लोकसंख्या अाहे. महादेव कोळी, ठाकूर आणि वारली या तीन आदिवासी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. बहुतेक गावे ग्रुप ग्रामपंचायतीत येतात. शिक्षण व आरोग्य सुविधा फारशा पोहोचलेल्या नाहीत. गावे विखुरलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे नाही. सध्या शाळेत जाणारी मुले-मुली त्यांच्या घरातील शिकणारी पहिली पिढी आहे.

हंगामी स्थलांतराचे प्रमाण खूप आहे. सिंचनाच्या सुविधा विकसित असलेल्या निफाडसारख्या तालुक्यात द्राक्षतोडीला जाणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. नाशिक शहरातही लोक कामासाठी स्थलांतर करतात.