सरकारसोबत काम

प्रगती अभियान विविध शासकीय समित्यांमध्ये सहभागी अाहे -

  • तांत्रिक सल्लागार समिती सदस्य, महाराष्ट्र सरकार रोहयो विभाग, जानेवारी २०१३ पासून
  • ‘मनरेगा कार्यवाहीच्या नियमवलीचा आढावा’ समिती सदस्य, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार (२०११-१३)
  • महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा अंमलबजावणी यंत्रणा सुधार समितीत सदस्य (२०११-१४)
  • मनरेगा कार्यगट सदस्य, नियोजन आयोग, भारत सरकार (२०११)
  • सामाजिक अंकेक्षण समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य (२०११-२०१५)

क्लस्टर फॅसिलिटेशन टीम (सीएफटी) प्रकल्प, त्र्यंबकेश्वर, नाशिक मध्ये काम

मनरेगा अंमलबजावणीतील एक अडचण म्हणजे कामासाठी आवश्यक मनुष्यबळ ग्रामपंचायत

स्तरावर उलपब्ध होऊ शकत नाही. विशेषत: माती परीक्षण, विकेंद्रित नियोजन, लोकसंघटन

इत्यादी कामासाठी जरूरीच्या गोष्टींसाठी सध्या मनुष्यबळाची कमतरता असून ती वाढवण्याची

गरज आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या क्लस्टर स्तरावर तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करण्याचे

काम सुरू झाले आहे. हा भारत सरकारचा उपक्रम असून निवडक तालुक्यात किमान तीन

क्लस्टर, प्रत्येक सीएफटीमध्ये तीन तज्ज्ञ व्यक्ती राहतील आणि मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी

त्यांचे सर्व आवश्यक सहाय्य उपलब्ध होईल.