Books

तगण्यापासून जगण्यापर्यंत...
या कथा आहेत पूर्णत: वास्तविक जगातल्या. त्यांचे लेखक आहेत प्रगती अभियानचे कार्यकर्ते. नेहमी कार्यकर्ते लिखाण करतात ते रिपोर्टच्या माध्यमातून. त्यात फक्त आकडे असतात. पण या कथांमध्ये प्रगती अभियानच्या कार्यकर्त्यांनी त्या आकड्यांमागच्या माणसांच्या गोष्टी टिपल्यात. रोजगार हमीनं त्यांच्या जगण्यात, त्यांच्या गावात काय बदल आणला तो शब्दात मांडला. कार्यकर्त्यांना लिहितं करत, लोकांना बोलत करत साकारलेलं हे अनोखं पुस्तक.

ग्राम रोजगार सेवक – माहिती पुस्तिका
रोजगार हमी योजनेच्या अमलबजावणीत ग्राम रोजगार सेवक हा महत्त्वाचा दुवा. गरजू मजुराला काम मिळवून देणारा, लहान शेतकऱ्याच्या शेतीच्या पाण्याची व्यवस्था करणारा आणि गावासाठी विकासाचा रस्ता तयार करणारा.

डाळींब – तेल्या रोग आणि व्यवस्थापन
कोरडवाहू परिसरातल्या छोट्या शेतकऱ्याला गरिबीतून बाहेर काढणारं डाळींब हे पीक. डाळींब बागेच्या मदतीनं अनेक
लहान कोरडवाहू शेतकरी बागायतदार बनले. पण मर आणि तेल्या या रोगांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

मागून तर पाहा...!
गरिबी हटवण्यासाठी अनेक सरकारी योजना आल्या. वैयक्तिक लाभाच्या, सार्वजनिक हिताच्या, गावाच्या विकासाच्या.
पण काही ठिकाणी त्या कागदावरच राहिल्या तर काही ठिकाणी गैरव्यवहारात अडकल्या. याबाबत सामान्य जनता जेव्हा न्याय मागण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना वाली कुणीच नसतो.

गरीबांचे चलन
भारतातील रेशन व्यवस्था ही गरिबांसाठीची जगातील सर्वात मोठी अन्नसुरक्षेची व्यवस्था आहे. ही व्यवस्था आज कमालीच्या भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मोडकळीस आली आहे. या व्यवस्थेला पर्याय आहे तो स्मार्ट कार्डसचा किंवा फूड स्टॅम्पचा.

आदिवासी नागली विकास कार्यक्रम : शेतकरी प्रशिक्षण पुस्तिका
आदिवासी शेतकऱ्यांना नागली लागवडीची सुधारित पद्धती समजावून देणारी आणि लागवडीपासून कापणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांची माहिती देणारी प्रशिक्षण पुस्तिका