धारणा

शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त गरीब लोक राहतात. बहुतेक ग्रामीण गरीब भूमीहीन किंवा सिंचनाच्या सुविधा नसलेले लहान शेतकरी आहेत. आपल्या उपजिविकेसाठी जरूरीची असलेली उत्पादक संसाधने त्यांना मिळू शकत नाहीत, शासकीय यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि समाजव्यवस्थेतही ते दुर्लक्षित राहतात. ज्यामुळे गरिबीचे दुष्टचक्र संपत नाही. 

यादृष्टीने आणलेल्या रोजगार हमी कायदा, रेशन व अन्य सुविधा व योजना सामान्य लोकांना उपयोगाच्या आहेत. पण या योजना जितक्या चांगल्या आहेत तितकी त्यांची अंमलबजावणी चांगली व परिणामकारक नाही. ती सुधारण्यासाठी प्रगती अभियान प्रयत्नशील आहे. शासकीय योजना व कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत नेण्यापासून, सरकारी यंत्रणेला अंमलबजावणीतील अडसर दूर करायला मदत करण्यापर्यंत अनेकविध कामे संस्था करते आहे. प्रशिक्षण व कौशल्यविकासाचे काम करते आहे. यात आम्हाला अनेक समविचारी संस्थांची साथ मिळते आहे. राज्य व देश पातळीवरील नेटवर्कमधून अनुभवांची देवाण-घेवाण होत आहे. योजना, धोरणे कायद्यावर असून उपयोगाचे नाही, ती प्रत्यक्षात येणे महत्त्वाचे आहे. योजना राबवली गेली तरच लोकांच्या आयुष्यात फरक पडतो, म्हणूनच ‘अंमलबजावणी हेच कामाचे खरे गमक आहे ’ ही आमची धारणा आहे.

Home 2a

प्रगती अभियानची भूमिका

ग्रामीण गरिबी दूर करणे हे प्रगती अभियानचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी संस्था ग्रामीण गरिबांसोबत २००६ पासून काम करत आहे. गरिबीच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठीचे पर्याय त्यांच्या सहभागाने व साथीने शोधणे असे या कामाचे स्वरूप आहे.

आपल्या राज्यघटनेने लोकांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिलेला आहे. त्याची पूर्तता होण्यासाठी हाताला काम पाहिजे, पोटाला अन्न पाहिजे, आरोग्य-शिक्षण-निवारा यांचीही हमी पाहिजे. त्यासाठी आवश्यक धोरणे व योजना करणे आणि त्यांची चोख अंमलबजावणी करणे आणि गरिबांना आपल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सहाय्य करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. यासाठी सरकार आणि लोकांमधील सेतू बनून काम करणे ही प्रगती अभियानची भूमिका आहे. 

आमचे कार्यक्रम

नाशिकच्या शेतकऱ्यांनी नागली कशी टिकवली? बीबीसी:

आम्ही महाराष्ट्रातल्या १३ जिल्ह्यांतील १९ तालुक्यातील ४४४ गावांमध्ये वंचित समुहांसोबत काम करतो.