नागलीचे पुनरुज्जीवन

नागली शेतीला प्रोत्साहन

आदिवासींच्या आहारातील मुख्य घटक असलेली नागली हे त्यांचे एक पारंपरिक पीक आहे. हलक्या आणि वरकस जमिनीवर घेतलं जाणारं हे तृणधान्य अत्यंत पौष्टिक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे नागलीच्या लागवडीचे प्रमाण कमी होत चालले आहे. परिणामी आदिवासींच्या आहारातील नागलीचे प्रमाणही कमी होत चालले आहेत्याची जागा रेशनवर मिळणाऱ्या इतर धान्यांनी घेतली आहे. आदिवासींच्या आहारात नागलीला पुर्नस्थापित करण्याच्या हेतूने प्रगती अभियानने नागलीचे उत्पादन वाढवण्यासाठीचा कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये नागली उत्पादनाच्या सुधारित पद्धतीची ओळख, बियाणेअवजारेस्थानिक उपलब्ध पदार्थांपासून बनवलेली खते किटकनाशकांचा वापर, धान्यावरील प्रक्रिया यांबाबतच्या प्रशिक्षण सहाय्याचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीने नागली पिकवण्याचे कष्टही जास्त होते, जे कमी झाले उत्पादनही वाढले, त्यामुळे आदिवासी पुन्हा नागली लागवडीकडे वळले आहेत. नागली भाकरी, पेज या पारंपरिक पदार्थांबरोबरच आता नागलीच्या नव्या पाककृतींची ओळख त्यांना झाली. अंगणवाडी आणि आश्रम शाळांतील मुलामुलींच्या आहारातही नागलीचा समावेश झाला

नागली लागवडीची सुधारित पद्धत

बीजामृताचे प्रात्यक्षिक
बिजाला बीजामृत लावणे
नर्सरीसाठी नांगरणी
गादीवाफ्यावर बियाणे पेरणी
मुख्य शेताची नांगरणी व तयारी
रोपांच्या लागवडीसाठी काठी व दोरीने खुणा करून त्यावर १५ दिवसांच्या रोपांची लागवड
लागवडीनंतर १५ दिवसांनी साईकल वीडरने किंवा हाताने निंदणी
मटका खताची तयारी
कीड व रोग नियंत्रण व पीक संरक्षणासाठी नीम तेलाची फवारणी
तयार पीक
उत्पादन मोजणी
Previous
Next

मूठभर पेरून खंडीभर पिकायचं, आता खंडीभर पेरून गोनभर पिकतंय…….

 चंद्रकांत कुवर, सीआरपी, पेठ
शिवखंडीच्या शंकर बाबा चौधरींची खंत  आदिवासी अल्पभूधारक शेतकरी नागली पिकाला देव मानतात, पण त्याचं उत्पादन मात्र घटत चाललं आहे. असं का होतंय हे समजून घ्यायला शेतकरी कुटुंबांशी चर्चा केली. त्यातलंच एक कुटुंब नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील शेवखंडी गावातले शंकर बाबा चौधरी यांचं. शेतकरी म्हणून त्याचं नाव सर्वपरिचित कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत ते वर्षाला ८० ते ८५ क्विंटल नागली पिकवायचे आणि घरासाठी राखून लोकांना सवायीने म्हणजे धान्याच्या बदल्यात धान्य परतफेडीच्या बोलीवर गरजू लोकांना वाटायचे.

आमचे रमेशभाऊ, बिनपगारी पण फुल अधिकारी!

आनंद बांबळे 
मोखाडा तालुक्यातील सडकेच्य कडेला वसलेलं सडकवाडी हे साधारणे पाचशे लोकसंख्येचं आदिवासी बहुल गाव. गावातले बहुतेक लोक शेती आणि मजुरीवर अवलंबून असलेले. आपलं शिक्षण फक्त तिसरीपर्यंत झालं याची खंत त्यांच्या मनात आहे. रमेश सक्रू बरफ हे याच सडकवाडीतील एक तरुण प्रगतशील शेतकरी. वय पस्तीस-चाळीस च्या आसपास. बारीक अंगकाठी. आणि मनमिळाऊ स्वभाव. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. शेतीही पाच एकराच्या आत. घरात चार मुलं, पत्नी आणि आजारी आई असा परिवार.