संस्थेची कोअर टीम

Ashwini-295x300 (1)_Original

आश्विनी कुलकर्णी

संस्थापक विश्वस्त. १ जून २००६ पासून संस्थेच्या कामात सहभागी. संस्था संचालक आणि संस्थेच्या
कामाला गती व दिशा देणे ही जबाबदारी.

uma

उमा घोसपुरीकर

संस्थेशी जोडली गेलेली पहिली व्यक्ती आणि संस्थेचा भक्कम आधार. आता विश्वस्त मंडळामध्येही असून प्रशासन व लेखा विभागाची जबाबदारी सांभाळतात.

sandip pawar

संदीप पवार

११ डिसेंबर २००९ पासून संस्थेच्या लेखा विभागात सहभागी. टॅली रेकॉर्ड आणि वित्तीय स्टेटमेंट करणे ही
जबाबदारी.

LB

एल बी जाधव

१ ऑगस्ट २०११ पासून संस्थेच्या ग्रामीण उपजिविका विकासाच्या कामांत सहभागी. कार्यक्षेत्रातील
कामांचा समन्वय आणि चोख नियोजनाचे कौशल्य.

sarla

सरला उगले

९ ऑगस्ट २०१४ पासून संस्थेत लेखा व प्रशासन विभागात काम, सर्व कार्यक्रमांना सहाय्य करून हिशोबाच्या फाईल व व्हाऊचर सांभाळण्याची जबाबदारी.

Sangita

संगिता जाधव

१ नोव्हेंबर २०११ पासून संस्थेत सहभागी असून लोकांसोबत काम करण्याचे कौशल्य. उत्तम प्रशिक्षक
आणि संघटक, लोकांसोबत काम करण्याची आवड.

ratna

रत्ना पहाडे

१६ जुलै २०१९ पासून संस्थेत डेटा एंट्री ऑपरेटरचे काम करत असलेली रत्ना आता कार्यक्रम आणि प्रशासन सहाय्यक म्हणूनही काम करते.

chandar

चंदर कुंवर

संस्थेच्या सुरूवातीपासून सहभागी चंदर स्वत: आदिवासी समाजाचे असल्याने इथल्या प्रश्नांची नस त्यांना अचूक समजते. ते पेठ तालुक्यातील गावकऱ्यांसोबत काम करतात.

Khadam

मोहन खडाम

संस्थेच्या सुरूवातीपासून सहभागी मोहन स्वत: आदिवासी, अत्यंत शांत आणि संयमी स्वभाव, लोकांसोबत
जोडून घेत पेठ तालुक्यातील गावकऱ्यांसोबत काम करतात.

Sunil

सुनिल घोडे

ग्रामीण उपजिविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून १ मे २०२१ पासून संस्थेत काम करणाऱ्या सुनिलने इगतपुरी भागातील गावांमध्ये काम विकसित केले.

shravan

श्रावण निरगुडे

त्र्यंबकेश्वर भागात काम सुरू झाले तेव्हापासून संस्थेत सक्रीय. अथक कामाची तयारी व लोकांशी संवाद साधायची हातोटी असलेले श्रावण त्र्यंबकेश्वर तालुक्यात काम करतात.

apurva (1)

अपूर्वा मालपुरे

१ डिसेंबर २०१९ पासून संस्थेमध्ये संशोधन आणि दस्तऐवजीकरणाच्या कामात सहभागी असलेल्या
अपूर्वाने टीआयएसएस मधून पदवी संपादित केली आहे.

Avatar

मोहन अवतार

संस्थेत काम करण्यासाठी गावकऱ्यांनी मोहनची निवड केली, त्यांचा विश्वास सार्थ ठरवून मोहनने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आपल्या गावात विकासाचे यशस्वी मॉडेल उभारले.

Vinayak Bhadange

विनायक भडांगे

संस्थेत काम करण्यासाठी गावकऱ्यांनी विनायकची निवड केली. १९ जून २०१९ पासून संस्थेसोबत राहून त्याने चिकाटीने सुरगण्यातील गावागावापर्यंत काम नेले.