मनरेगा म्हणजे ‘मागेल त्यांना, मागेल तेव्हा, मागेल तेवढे’ काम मिळण्याची हमी. तुम्ही मनरेगा मजूर असाल किंवा मनरेगा कार्यकर्ता, रोजगार सेवक किंवा लोकप्रतिनिधी वा सरकारी अधिकारी असाल…. तुमचा मनरेगाचा अनुभव काय आहे? मनरेगाचे चांगले वाईट अनुभव, प्रक्रिया, काम आदींबद्दलची मनोगते संकलित करणे आणि समजून घेणे हा ‘मनरेगा डायरी’चा उद्देश आहे. आपले अनुभव मनमोकळेपणे सांगा, मनरेगा सक्षम करायला हातभार लावा.