मूठभर पेरून खंडीभर पिकायचं, आता खंडीभर पेरून गोनभर पिकतंय…….
चंद्रकांत कुवर, सीआरपी, पेठ
शिवखंडीच्या शंकर बाबा चौधरींची खंत
आदिवासी अल्पभूधारक शेतकरी नागली पिकाला देव मानतात, पण त्याचं उत्पादन मात्र घटत चाललं आहे. असं का होतंय हे समजून घ्यायला शेतकरी कुटुंबांशी चर्चा केली. त्यातलंच एक कुटुंब नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील शेवखंडी गावातले शंकर बाबा चौधरी यांचं. शेतकरी म्हणून त्याचं नाव सर्वपरिचित कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत ते वर्षाला ८० ते ८५ क्विंटल नागली पिकवायचे आणि घरासाठी राखून लोकांना सवायीने म्हणजे धान्याच्या बदल्यात धान्य परतफेडीच्या बोलीवर गरजू लोकांना वाटायचे.
आमचे रमेशभाऊ, बिनपगारी पण फुल अधिकारी!
आनंद बांबळे
मोखाडा तालुक्यातील सडकेच्य कडेला वसलेलं सडकवाडी हे साधारणे पाचशे लोकसंख्येचं आदिवासी बहुल गाव. गावातले बहुतेक लोक शेती आणि मजुरीवर अवलंबून असलेले. आपलं शिक्षण फक्त तिसरीपर्यंत झालं याची खंत त्यांच्या मनात आहे.
रमेश सक्रू बरफ हे याच सडकवाडीतील एक तरुण प्रगतशील शेतकरी. वय पस्तीस-चाळीस च्या आसपास. बारीक अंगकाठी. आणि मनमिळाऊ स्वभाव. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. शेतीही पाच एकराच्या आत. घरात चार मुलं, पत्नी आणि आजारी आई असा परिवार.