सरकारी यंत्रणेसोबतचे काम
प्रगती अभियान विविध शासकीय समित्यांमध्ये सहभागी आहे.
- तांत्रिक सल्लागार समिती सदस्य, महाराष्ट्र सरकार रोहयो विभाग, जानेवारी २०१३ पासून
- मनरेगा कार्यवाहीच्या नियमवलीचा आढावा’ समिती सदस्य, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार (२०११–१३)
- महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा अंमलबजावणी यंत्रणा सुधार समितीत सदस्य (२०११–१४)
- मनरेगा कार्यगट सदस्य, नियोजन आयोग, भारत सरकार (२०११)
- सामाजिक अंकेक्षण समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य (२०११–२०१५)
- भारत सरकारच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पुरस्कारांची शिफारस करण्यासाठी राज्य
- ग्रामीण विकास विभागाने गठित केलेल्या समितीचे सदस्य.
- राज्य सरकारच्या ग्राम समृद्धी योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य.
- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक लेखापरीक्षण संचालनालयाच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य.
- ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भारत ग्रामीण उपजीविका फेडरेशनचे सर्वसाधारण सभेचे सदस्य.
- मनरेगा सचिव आणि आयुक्तांशी नियमित चर्चा व मिटींग
- मनरेगा विभागाच्या पुनर्रचना समिती अहवालात सहभाग
- मनरेगाविषयी स्वयंसेवी संस्थांसोबत अखर्चिक भागीदारीचा करार विषयक जीआर निर्मितीमध्ये सहभाग
- आदिवासी विकास विभागाच्या नागली विकास प्रकल्पात सहभाग (२०१९ पासून)
- नाशिक जिल्हा परिषदेसोबत संस्थांच्या अखर्चिक भागीदारीचा करार (2022 पासून). मनरेगातील अडचणी दूर होऊन अंमलबजाणी मजबूत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्याचा निर्णयाचे परिपत्रक १३ जानेवारी २०२१ ला जाहीर करण्यात आले.