हवामान अनुकूलन

जलवायू परिवर्तन समस्या आज सर्व जगाला भेडसावत आहे. निसर्गाचे चक्र बदलले असून त्यांचा परिणाम शेतीवर आणि अन्य रोजगारांवर झालेला आहे. काहींच्या अतिलाभामुळे निर्माण झालेल्या या समस्येचा फटका मात्र परिघावरील व वंचित समुदायांना अधिक बसतो.

एक प्रकारे या समस्येच्या पोटातच त्याचे उत्तर आहे. ग्रामीण व आदिवासी समुदायांच्या शेतीच्या, नैसर्गिक संसाधनांच्या वापराच्या कित्येक पद्धती हवामान बदलाशी जुळवून घेण्याऱ्या आहेत. हवामान बदलाशी जुळवून घेताना नवी उत्तरे शोधावी लागतील, तसेच त्यांचे पारंपरिक ज्ञानही उपयुक्त ठरणार आहे.

याच हेतून आम्ही हवामान अनुकूलनासाठी दोन प्रकारे काम करत आहोत:

  • समस्या सर्वांगाने समजून घेणे: आम्ही लोकांशी बोलतो, त्यांचे ऐकतो. हवामान बदलाच्या कोणकोणत्या परिणामांना ते तोंड देत आहेत, त्यांना परिसरात कोणते बदल जाणवतात - हे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून आम्ही जाणून घेतो.
  • आपल्या आवाक्यातील उत्तरे शोधणे: सध्या ते कोणत्या पद्धती वापरतात हे समजून घेतो व नोंदवतो. पारंपरिक पिके, शेतीच्या पद्धती, उपजिविकेची कामे यामध्ये हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी कोणते बदल करावे लागतील हे अभ्यासतो.

हवामान बदलाच्या संदर्भाने स्थानिक ज्ञान आणि व्यापक ज्ञान यातील अंतर मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. गाव समुदायांच्या सहभागाने स्थानिक पातळीवर लागू पडतील अशी उत्तरे शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Go Back Top