धारणा

शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त गरीब लोक राहतात

बहुतेक ग्रामीण गरीब भूमीहीन किंवा सिंचनाच्या सुविधा नसलेले लहान शेतकरी आहेत. आपल्या उपजिविकेसाठी जरूरीची असलेली उत्पादक संसाधने त्यांना मिळू शकत नाहीत, शासकीय यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि समाजव्यवस्थेतही ते दुर्लक्षित राहतात. ज्यामुळे गरिबीचे दुष्टचक्र संपत नाही.

यादृष्टीने आणलेल्या रोजगार हमी कायदा, रेशन व अन्य सुविधा व योजना सामान्य लोकांना उपयोगाच्या आहेत. पण या योजना जितक्या चांगल्या आहेत तितकी त्यांची अंमलबजावणी चांगली व परिणामकारक नाही. ती सुधारण्यासाठी प्रगती अभियान प्रयत्नशील आहे. शासकीय योजना व कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत नेण्यापासून, सरकारी यंत्रणेला अंमलबजावणीतील अडसर दूर करायला मदत करण्यापर्यंत अनेकविध कामे संस्था करते आहे. प्रशिक्षण व कौशल्यविकासाचे काम करते आहे. यात आम्हाला अनेक समविचारी संस्थांची साथ मिळते आहे. राज्य व देश पातळीवरील नेटवर्कमधून अनुभवांची देवाण-घेवाण होत आहे. योजना, धोरणे कायद्यावर असून उपयोगाचे नाही, ती प्रत्यक्षात येणे महत्त्वाचे आहे. योजना राबवली गेली तरच लोकांच्या आयुष्यात फरक पडतो, म्हणूनच ‘अंमलबजावणी हेच कामाचे खरे गमक आहे ’ ही आमची धारणा आहे.

प्रगती अभियानची भूमिका

ग्रामीण गरिबी दूर करणे हे प्रगती अभियानचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी संस्था ग्रामीण गरिबांसोबत २००६ पासून काम करत आहे. गरिबीच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठीचे पर्याय त्यांच्या सहभागाने व साथीने शोधणे असे या कामाचे स्वरूप आहे.

आपल्या राज्यघटनेने लोकांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिलेला आहे. त्याची पूर्तता होण्यासाठी हाताला काम पाहिजे, पोटाला अन्न पाहिजे, आरोग्य-शिक्षण-निवारा यांचीही हमी पाहिजे. त्यासाठी आवश्यक धोरणे व योजना करणे आणि त्यांची चोख अंमलबजावणी करणे आणि गरिबांना आपल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सहाय्य करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. यासाठी सरकार आणि लोकांमधील सेतू बनून काम करणे ही प्रगती अभियानची भूमिका आहे.

आमची कार्ये

ठळक महत्त्वाचे

Play Video Play Video Play Video Play Video

शाश्वत विकास ध्येये - आमचे योगदान

गरिबी निर्मूलन
  • मनरेगा, पशुपालन, बांबू-आधारित रोजगार आदींच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांच्या रोजगार निर्मितीला चालना.
  • खात्रीशीर वेतन आणि संसाधन समृद्धीच्या दृष्टीने रोजगार निर्मितीवर भर.
उपासमारीचे समूळ उच्चाटन
  • नागली उत्पादन वाढ आणि अन्नसुरक्षेवर भर.
  • कोरडवाहू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाची उत्पादकता आणि पोषणमूल्य सुधारण्यासाठी सहाय्य.
आरोग्य व स्वास्थ्य
  • प्राथमिक धान्य प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर केल्याने स्त्रियांच्या शारीरिक कष्टांमध्ये घट आणि मनरेगातून स्त्रियांना स्थानिक रोजगाराची हमी.
  • कोविडग्रस्त कुटुंबातील स्त्रियांना रोजगारनिर्मितीसाठी सहाय्य.
गुणवत्तापूर्ण शिक्षण
सीआरपी, एफपीओ यांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण.
लिंगभावसमानता
  • सर्व रोजगार निर्मिती उपक्रमांमध्ये स्त्रियांचा सहभाग.
  • स्त्रियांचे कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर (प्राथमिक प्रक्रिया).
  • सुधारित शेती आणि मनरेगा काम मागणी बाबत स्त्रियांचा क्षमता विकास.
स्वच्छ पाणी व स्वच्छता
  • मनरेगातून जलसंवर्धन, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी सुविधा निर्माण करण्यावर भर.
चांगल्या दर्जाचा रोजगार आणि आर्थिक विकास
  • मनरेगा, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, बांबू आधारित उद्योगातून स्थानिक व सन्मानपूर्ण रोजगार विकसित करण्यावर भर.
  • शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) सक्षमीकरण.
उद्योग, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि पायभूत संरचना
  • मनरेगातून स्थानिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर (रस्ते, पाणी साठवण, जनावरांची शेड, वृक्षलागवड इत्यादी).
  • विकेंद्रित, अल्प खर्चातील, सोप्या तंत्रज्ञानाचा अवलंब, जसे की, सिंगल फेज मळणी यंत्र, सौर्यउर्जेवर चालणारी प्रक्रिया यंत्रे.
विषमता कमी करणे
  • दुर्गम आदिवासी पाड्यांना गावच्या विकासकामात सहभागी करून घेणे.
  • कोविडकाळात आर्थिक व जीवित हानीचा फटका सहन करावा लागलेल्या कुटुंबांना रोजगार निर्मितीसाठी सहाय्य.
शाश्वत शहरे आणि समुदाय
  • ग्रामपंचायत, शेतकरी उत्पादक संघटना आदी गावपातळीवरील संस्थात्मक यंत्रणा सक्षम करण्यावर भर.
  • समुदायाच्या पुढाकाराने आणि स्थानिक गरजांना अनुसरून मनरेगा कामांचे नियोजन करण्यावर भर.
साधनांचा जबाबदारीने वापर आणि उत्पादन
  • स्थानिक वाणांचे पुनरुज्जीवन, स्थानिक वाणांचा सुधारित वापर आणि स्थानिक अन्नधान्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर.
  • शाश्वत, सुधारित आणि कमी खर्चिक शेतीपद्धतींचा अवलंब.
पर्यावरण कृती
  • नागलीच्या स्थानिक वाणांचे पुनरुज्जीवन.
  • मनरेगांतर्गत कामांतून मातीची धूप रोखणे, जलसंवर्धन आणि वनीकरण करणे यांवर भर.
भूजीवन
  • मनरेगातून पाणलोट क्षेत्र विकास, जल व माती संवर्धन, बांबू आधारित उद्योग, वृक्षलागवड व वनीकरणावर भर.
ध्येयांच्या पूर्ततेसाठी भागीदारी
  • सरकारी यंत्रणेशी समन्वयाने काम (मनरेगा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था).
  • नेटवर्क, अभ्यासक, स्थानिक स्वयंसेवी संस्थांसोबत सक्रीयपणे काम.
  • तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य यासाठी वासन, आरआरए नेटर्वक, महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाऊंडेशन, पाबळ आश्रम आदी संस्थांसोबत भागीदारी.

Go Back Top